तुटवडा संपताच गॅस एजन्सी चालू करण्याची प्रोसेस पुन्हा सुरु होणार? जाणून घ्या अटी अन् रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रोसेस!

Rashmi Mane

गॅस एजन्सी व्यवसाय का फायदेशीर?

आजच्या काळात प्रत्येक घरात LPG गॅस सिलेंडरची गरज असते. त्यामुळे गॅस एजन्सीचा व्यवसाय हा कायम मागणीत राहणारा आणि स्थिर उत्पन्न देणारा पर्याय मानला जातो. योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय मोठ्या नफ्याचा ठरू शकतो.

LPG cylinder production India | Sarkarnama

कोण सुरू करू शकतो गॅस एजन्सी?

गॅस एजन्सीसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारने ठरवलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.


LPG cylinder production India | Sarkarnama

शिक्षणाची अट काय?

गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी अर्जदार किमान 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ही अट पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आली आहे.

LPG cylinder production India | Sarkarnama

जमीन असणे का महत्त्वाचे?

LPG गोडाऊन आणि ऑफिससाठी योग्य जागा असणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षा नियमांनुसार पुरेशी जागा आणि सुरक्षित परिसर असणे आवश्यक मानले जाते.

LPG Cylinder

किती भांडवल लागते?

गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी चांगल्या प्रमाणात आर्थिक तयारी आवश्यक असते. ऑफिस, गोडाऊन, वाहन व्यवस्था आणि कर्मचारी खर्चासाठी पुरेसा फंड असणे गरजेचे आहे.


LPG Cylinder

कोणती कागदपत्रे लागतात?

अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा ओळखपत्र, जमिनीचे कागदपत्र, बँक स्टेटमेंट आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक असतात. सर्व कागदपत्रे अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे.

LPG cylinder production India | Sarkarnama

अर्ज प्रक्रिया कशी असते?

शहरी आणि ग्रामीण भागासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. अर्जदारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून आवश्यक माहिती भरावी लागते.

LPG Cylinder | Sarkarnama

रजिस्ट्रेशन करताना लक्षात ठेवा

अर्ज भरताना माहिती अचूक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण मानली जाते. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.


LPG cylinder price | Sarkarnama

निवडीनंतर मिळते ट्रेनिंग

अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित कंपन्या एजन्सीधारकांना विशेष प्रशिक्षण देतात. यात सिलेंडर हाताळणी, सुरक्षा नियम आणि ग्राहक सेवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते.


LPG | Sarkarnama

 Next : स्वतःच्या मतदारसंघात न राहणारे कोल्हापुरातील आजी आमदार-खासदार 

येथे क्लिक करा