Jagdish Patil
NVIDIA याचे सहसंस्थापक, CEO जेन्सेन हुआंग यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या CEO पदाची जबाबदारी कोलेट क्रेस यांच्याकडे सोपवली आहे.
संचालक मंडळाने त्यांची अंतरिम CEO म्हणून नियुक्ती केली आहे. कायमस्वरूपी CEO निवड होईपर्यंत क्रेस पदभार सांभाळतील.
हुआंग यांच्या नेतृत्वाखाली NVIDIA याने ग्राफिक्स चिप उत्पादक कंपनीपासून AI क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी म्हणून विस्तार केला.
कोलेट क्रेस सप्टेंबर २०१३ मध्ये NVIDIA मध्ये कार्यकारी उपाध्यक्ष आणि CFO म्हणून रुजू झाल्या.
कंपनीच्या आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तिमाही निकालांच्या घोषणेदरम्यान त्या गुंतवणूकदारांशी संवाद साधत.
क्रेस NVIDIA मध्ये रुजू झाल्या, तेव्हा कंपनीचा वार्षिक महसूल ४.१३ अब्ज डॉलर होता. २०२६ मध्ये तो २१५.९ अब्ज डॉलरवर पोहोचला.
एनव्हिडियामध्ये येण्यापूर्वी त्यांनी टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये आठ वर्षे वित्तीय विभागात काम केले.
त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये विविध वित्तीय पदांवर काम केलंय. तर २००६ मध्ये त्या कंपनीच्या सर्व्हर आणि टूल्स विभागाच्या CFO बनल्या.
क्रेस यांनी अॅरिझोना विद्यापीठातून वित्त विषयात पदवी घेतली तर सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठातून MBA पूर्ण केलं.
फोर्ब्सच्या २०२६ मधील अमेरिकेतील स्वकर्तृत्वावर श्रीमंत झालेल्या महिलांच्या यादीत कोलेट क्रेस यांचा ३२ वा क्रमांक आहे.