Jagdish Patil
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
अखिलेश यांचा राजकीय प्रवास सर्वांना माहिती आहे. तर त्यांच्या पत्नी डिंपल यादव या देखील सध्या राजकारणात आहेत.
डिंपल या देशातील प्रमुख महिला राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी लखनौ विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली आहे.
अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टींग आहे.
अखिलेश 21 आणि डिंपल फक्त 17 वर्षांच्या असताना एका मित्राच्या माध्यमातून त्यांची पहिली भेट झाली.
या भेटीनंतर 4 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घरच्यांना सांगितला.
महत्वाचं म्हणजे अखिलेश आणि डिंपल यांचा आंतरजातीय विवाह आहे हे अनेकांना माहिती नाही.
दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला तीव्र विरोध केला.
मात्र, अखिलेश यांच्या आजी मूर्ती देवी यांच्या आग्रहामुळे मुलायम सिंह यांनी लग्नाला परवानगी दिली आणि 24 नोव्हेंबर 1999 रोजी त्यांचा विविह सोहळा पार पडला.