सरकारनामा ब्यूरो
हरी चंदना दासरी या 2010 बॅचच्या तेंलगना केडरच्या IAS अधिकारी आहेत.
दासरी यांना प्रशासनातील चांगल्या कामाचा कौतुक म्हणून प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
चंदना दासरी या हैदराबाद येथील राहणाऱ्या आहेत. त्यांचे वडील श्री. डी. श्रीनिवास हे आंध्रप्रदेश येथे IAS अधिकारी होते.
चंदना यांच शालेय शिक्षण हैदराबाद मध्ये झालं. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून पर्यावरण, अर्थशास्त्र या विषयात MSC ची डिग्री घेतली आहे.
शिक्षणानंतर त्यांनी लंडनमध्ये वर्ल्ड बँक, लंडन बीपी शेल या कंपनीतही काम केले.परंतु काही दिवसात त्यांनी नोकरी सोडली आणि त्या भारतात पुन्हा परतल्या.
त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले.तरीही त्यांनी परीक्षेची तयारी सुरुच ठेवली.
चंदना यांनी 2009 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
हरी चंदना दासरी यांची निवड IAS अधिकारी म्हणून करण्यात आली.