Rashmi Mane
गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारं AI-787 हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांत भीषण अपघाताला सामोरं गेलं. या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं – Airbus की Boeing, कोणती कंपनी अधिक सुरक्षित?
एअरबस (Airbus) – युरोपियन कंपनी, मुख्यालय फ्रान्समध्ये
बोईंग (Boeing) – अमेरिकन कंपनी, मुख्यालय वॉशिंग्टन, यूएसए
ह्या दोघांमध्ये जगभरात वर्चस्वासाठी शर्यत सुरु आहे.
एअरबस – स्थापना 1970 आणि बोईंग – खूप जुनी कंपनी, स्थापना 1916
बोईंगचा अनुभव अधिक, पण एअरबसने आधुनिकतेत झेप घेतली आहे.
एअरबस: A320, A330, A350, A380 (सर्वात मोठं प्रवासी विमान) तर
बोईंग: 737, 777, 787 ड्रीमलाइनर, 747 "जंबो जेट"
एअरबस: साइड-स्टिक (जॉयस्टिकसारखं) – अर्धस्वयंचलित प्रणाली
बोईंग: कंट्रोल योक (स्टीयरिंगसारखं) – पूर्णपणे पायलट-आधारित
दुर्घटना अनेकदा होते मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा प्रतिकूल हवामानामुळे.
दोन्ही कंपन्यांची सुरक्षा पातळी उच्चच मानली जाते.
टेक्नॉलॉजी व ऑटोमेशन हवं असेल तर एअरबस आणि पायलट-केंद्रित अनुभव हवं असेल तर बोईंग.
विमान कितीही आधुनिक असलं, तरी सुरक्षा पायलट, इंजिनिअरिंग व हवामानावरही अवलंबून असते. आपल्या सुरक्षित प्रवासासाठी निवडा जबाबदार एअरलाइन!