रेल्वेचं कन्फर्म तिकीट कुटुंबातील सदस्याला करता येईल ट्रान्सफर? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Mangesh Mahale

तिकीट ट्रान्सफरची सुविधा

प्रवास शक्य नसल्यास काही विशिष्ट अटींवर कन्फर्म तिकीट कुटुंबातील सदस्याच्या नावावर हस्तांतरित करता येते.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

कोणाच्या नावावर करता येते?

वडील, आई, भाऊ, बहीण, पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी अशा कुटुंबातील सदस्याच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करता येते.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

नाव बदलण्याची मर्यादा

एका कन्फर्म तिकिटावरील प्रवाशाचे नाव केवळ एकदाच बदलता येते.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

पुन्हा ट्रान्सफर करता येणार नाही

एकदा नाव बदलल्यानंतर त्याच तिकिटावरील प्रवाशाचे नाव पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर बदलता येत नाही.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

ग्रुप प्रवासासाठी

विद्यार्थी आणि लग्नाच्या वरातीच्या ग्रुपमधील एकूण प्रवाशांपैकी जास्तीत जास्त १० टक्के प्रवाशांची नावे बदलता येतात.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

किती तास आधी अर्ज करावा?

प्रवासाच्या श्रेणीनुसार रेल्वे सुटण्याच्या किमान २४ किंवा ४८ तास आधी नाव बदलण्यासाठी लेखी अर्ज करावा.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

कोणती कागदपत्रे?

मूळ कन्फर्म तिकीट, दोन्ही प्रवाशांची ओळखपत्रे आणि त्यांच्यातील नातेसंबंधाचा पुरावा अर्जासोबत जोडावा.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

कुठे करावी प्रक्रिया?

जवळच्या मोठ्या रेल्वे स्थानकावर मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांकडे अर्ज सादर करावा. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

अधिकृत परवानगी

कन्फर्म तिकीट दुसऱ्या व्यक्तीला थेट देऊन प्रवास करता येत नाही. रेल्वेची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे.

Confirmed Railway Ticket Transfer | AI

NEXT: शेतकऱ्यांनो, फळबागेच्या तार कुंपणासाठी मिळतेय अनुदान! Farmer ID वापरून महाडीबीटीवर असा करा अर्ज

येथे क्लिक करा