Mangesh Mahale
वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून तार कुंपणासाठी अनुदान.
एकात्मिक फलोत्पादन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी अनुदानाची सुविधा.
एक एकर फळबागेसाठी जास्तीत जास्त 1,000 रनिंग मीटर तार कुंपणासाठी अनुदान.
शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) शेतकरी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येईल.
महाडीबीटी पोर्टलवर Farmer ID आणि OTP वापरून लॉगिन करा.
'घटकासाठी अर्ज करा' या पर्यायावर क्लिक करून 'फलोत्पादन' विभाग निवडा.
घटक प्रकारात 'इतर घटक' आणि उपघटकामध्ये 'कुंपण घालणे (Fencing)' निवडा.
प्रस्तावित क्षेत्रामध्ये आवश्यक कुंपणाची लांबी नोंदवा. कमाल मर्यादा 1,000 रनिंग मीटर आहे.
अर्ज सादर करताना 23 रुपये 60 पैसे शुल्क भरावे लागेल. UPI, Google Pay, QR Code किंवा नेट बँकिंगचा वापर करता येईल.