सरकारनामा ब्यूरो
डॉ. विश्वजीत कदम हे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत.
तरुण वयात मोठी जबाबदारी स्वीकारणाऱ्या युवा राजकारण्यापैकी विश्वजीत कदम यांची ओळख आहे.
राजकारणासह कदम यांना समाज, शिक्षण, क्रीडा आणि अन्य क्षेत्राताचीही विशेष रुची आहे.
उच्च शिक्षण घेतलेल्या कदम यांच्याकडे बीई, एमबीए, पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
भारती विद्यापीठाचे कार्यवाहक तसेच सहकारी सूत गिरणी व सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदावरही त्यांनी दीर्घकाळ काम केले.
पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्षपद सांभाळले आहे.
काँग्रेसच्या या युवा नेत्याने महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षे राज्यमंत्री पद भुषवले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
बुलढाणा ते सांगली अशी संवाद पदयात्रा काढून दुष्काळग्रस्तांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले.