Jagdish Patil
काँग्रेसने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक आणि झारखंडमधील जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले आहेत.
यामध्ये राजस्थानमधील विद्यमान राज्यसभा खासदार नीरज डांगी यांना काँग्रेसने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
राहुल गांधींच्या कोअर टीमच्या विश्वासू सदस्या माजी खासदार मीनाक्षी नटराजन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी दिली आहे.
तामिळनाडूतून प्रवीण चक्रवर्ती आणि झारखंडमधून प्रणव झा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर कर्नाटकातून मल्लिकार्जुन खर्गे, पवन खेरा आणि मन्सूर अली खान यांना पक्षाने मैदानात उतरवलं आहे.
या उमेदवारांमध्ये सध्या काँग्रेसच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत आहे.
कारण, काँग्रेसने 2022 साली जेव्हा 10 राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये खेरा यांना डावलण्यात आलं होतं.
त्यामुळे नाराज झालेल्या खेरा यांनी 'कदाचित माझ्या तपस्येतच काहीतरी कमतरता राहिली असावी' असं वक्तव्य सोशल मीडियावर केलं होतं.
मात्र, आता उमेदवारी मिळताच खेर यांना त्यांच्या तपस्येचं फळ मिळाल्याची चर्चा रंगली आहे.