Rajanand More
अंगोमचा बिमोल अकोइजम हे मणिपूरमधील काँग्रेसचे खासदार आहेत. तसेच ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापकही होते.
भाजपच्या महिला खासदारांनी अकोइजम यांची थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांना लोकसभेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे.
अंगोमचा बिमोल अकोइजम यांच्यावर किमान विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. 'सेक्स फॉर मार्क्स' या प्रकरणात अकोइजम अडकले आहेत.
आरोप झाल्यानंतर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केलो होती. प्राथमिक चौकशी ते दोषी आढळल्याने त्यांची प्राध्यापक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या तक्रारीनंतर अकोइजम यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत.
आपल्या खासदारावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊनही काँग्रेस नेते शांत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यांच्यावर पक्षाने अजूनही कुठलीही कारवाई केलेली नाही.
काँग्रेस त्यांना पाठीशी घालत आहे. त्यांना पक्षातून तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे.
अकोइजम यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण ईशान्य भारतातील असल्याने आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.