IPS पत्नीसाठी केडर बदलून महाराष्ट्रात, आता वर्षभरातच IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

Rajanand More

IPS आदित्य कुमार सिंह

भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी आदित्य कुमार सिंह यांनी तीन वर्षांतच नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूरही करण्यात आला आहे. ते २०२३ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.

IPS Aditya Kumar Singh | Sarkarnama

महाराष्ट्र केडर

आदित्य सिंह हे मुळचे ओडिशा केडरचे अधिकारी होते. पण लग्नानंतर त्यांनी विनंती करून केडर बदलून ते महाराष्ट्रात आले होते. त्याला वर्षही पूर्ण झालेले नाही.

IPS Aditya Kumar Singh | Sarkarnama

पत्नीही IPS

IPS इशानी आनंद या त्यांच्या पत्नी आहेत. त्या २०२४ च्या तुकडीच्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Eshani Anand | Sarkarnama

केडरमध्ये बदल

विवाहानंतर आदित्य सिंह यांच्या केडर बदलीच्या विनंतीवर मागील वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर ते महाराष्ट्रात रुजू झाले होते.

IPS Aditya Kumar Singh, IPS Eshani Anand | Sarkarnama

एसएसपी

महाराष्ट्रात रुजू झाल्यानंतर आदित्य सिंह यांची बुलढाण्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षक (अंडर ट्रेनी) या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

IPS Aditya Kumar Singh

वर्षभरातच राजीनामा

महाराष्ट्रात येऊन आदित्य सिंह यांना एक वर्षही उलटले नाही. त्याआधीच त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Police | Sarkarnama

कारण काय?

आदित्य सिंह यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत पती-पत्नीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

IPS Aditya Kumar Singh, IPS Eshani Anand | Sarkarnama

मुळचे दिल्लीचे

आदित्य सिंह हे मुळचे दिल्लीचे असून त्यांनी १ ऑगस्ट २०२२ रोजी नागरी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

IPS Aditya Kumar Singh | Sarkarnama

NEXT : कायद्यातील 'या' दोन कलमांच्या आधारे पोलिसांनी CJP नेत्यांची केली कोंडी

येथे क्लिक करा.