Rashmi Mane
आगामी लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची दुसरी यादी (12 मार्च 2024) जाहीर केली आहे.
देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोग आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर करू शकतो.
या यादीत काँग्रेसने लोकसभेसाठी 43 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ तसेच प्रद्युत बोर्डलोई या लोकसभेच्या तीन विद्यमान खासदारांचा समावेश असलेल्या 43 उमेदवारांची दुसरी यादी आज काँग्रेसने जाहीर केली.
आसाम 12, राजस्थान 10, मध्य प्रदेश 10, गुजरात 7, उत्तराखंड 3 तसेच दमण आणि दीवचे 1 या यादीमध्ये राज्यनिहाय उमेदवार समाविष्ट केले आहेत.
काँग्रेसच्या यादीमध्ये युवकांना संधी देण्यात आली आहे. यादीत 25 उमेदवारांचे वय 50 वर्षांखालचे असून, 51 ते 60 वयोगटातील 8 तर 61 ते 72 वयोगटातील 10 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने शनिवारी, 9 मार्च रोजी 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
काँग्रेसने 76.7 टक्के ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्याक उमेदवारांना संधी दिली आहे. 13 ओबीसी, 10 खुला प्रवर्ग, 10 अनुसूचित जाती तसेच 9 अनुसूचित जमाती 1 मुस्लिम अशा उमेदवारांचा समावेश आहे.
R