काँग्रेसने तिकीट नाकारले, पठ्ठ्याने अपक्ष लढत जिंकली निवडणूक; 14 दिवस अनवाणी प्रचार

Rajanand More

दीपांशू शौकीन

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) 2026 निवडणुकीत अपक्ष उमेदवार दीपांशू शौकीन यांनी उपाध्यक्षपदावर विजय मिळविला आहे. या विजयाची देशभरात चर्चा होत आहे.

Deepanshu Shokeen | Sarkarnama

सर्वाधिक मते

निवडणुकीत दीपांशू यांनी सर्वाधिक 30,615 मते मिळवत ABVP, NSUI या मातब्बर विद्यार्थी संघटनांना धूळ चारली. ABVPचे ईशू मौर्य यांना 16,910 मते तर NSUIच्या उमेदवाराला केवळ 4,313 मते मिळाली.

Deepanshu Shokeen | Sarkarnama

NSUI चे कार्यकर्ते

दीपांशू हे मुळचे काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयचे कार्यकर्ते आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून ते या निवडणुकीत एनएसयूआयचा प्रचार करत होते.

Deepanshu Shokeen | Sarkarnama

तिकीट नाकारले

यंदाच्या निवडणुकीत दीपांशू यांनी तिकीट मागितले होते. त्यानुसार त्यांचे नाव आघाडीवरही होते. मात्र, अचानक त्यांचे नाव मागे पडले. त्यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले.

Deepanshu Shokeen | Sarkarnama

अपक्ष उमेदवार

एनएसयूआयने तिकीट नाकारल्याने त्यांनी माघार न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांना विद्यापीठातून प्रचंड प्रतिसादही मिळाला.

Deepanshu Shokeen | Sarkarnama

चप्पल घालणे सोडले

दिल्लीतील सत्य निकेतन खासगी वसतिगृह दुर्घटनेनंतर दीपांशू यांनी चप्पल घालणे सोडून दिले होते. जोपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज बनत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ. १४ दिवस ते चप्पलेविना प्रचार. अखेर विजयी झाल्यानंतर चप्पल घातली.

Deepanshu Shokeen | Sarkarnama

'बौद्ध अध्ययन'चे विद्यार्थी

दीपांशू हे सध्या दिल्ली विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन विभागात शिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांनी शहीद भगतसिंग कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Deepanshu Shokeen | Sarkarnama

राजकीय पार्श्वभूमी नाही

दीपांशू यांचे कुटुंब दिल्लीतच असून त्यांचे वडील बस कंडक्टर तर आई अंगणवाडी कार्यकर्त्या आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा आर्थिक क्षमता नसताना त्यांनी दणदणीत विजय मिळविला.

Deepanshu Shokeen | Sarkarnama

NEXT : परराष्ट्रमंत्र्यांच्या एका फोटोने वेधले लक्ष, 'ब्युटी क्वीन'चा असा आहे प्रवास...

येथे क्लिक करा.