Deepak Kulkarni
नाना पटोले हे महाराष्ट काँग्रेसमधील एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. ते सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
पटोले हे काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत.
आक्रमक स्वभाव आणि रोखठोक भूमिकांमुळे राज्याच्या राजकारणात ते नेहमीच चर्चेत असतात.
महायुती सरकारवर टीकेची झोड उठवण्याची ते एकही संधी सोडत नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी काही काळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे.
नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली.
यानंतर 1999 ते 2014 या काळात सलग 3 टर्म आमदार म्हणून काम केलं आहे.
2014 मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा 1 लाख 49 हजार 254 मतांनी पराभव केला.
2019 मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.