Roshan More
काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर वोट बचाव देश बचाव रॅलीचे आयोजन केले होते.
हे मैदान प्रचंड मोठे आहे. त्यामुळे आजच्या रॅलीला गर्दी होणार की नाही याची चर्चा होती.
आजच्या रॅलीतून इंडिया आघाडीची एकजूट दिसून आली. आघाडीतील सर्व प्रमुख नेते आले होते.
सभा 12 वाजता सुरू होणार होती. मात्र, सभेपूर्वीच हे मैदान खचाखच भरले होते.
राहुल गांधींचे आगमन झाल्यानंतर जल्लोष करत उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले.
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होट चोरीचा कट रचला आहे, अशी टीका करत त्यांना जेलमध्ये जावेच लागेल, असा इशारा दिला.
राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी कुठे जाणार नाही. आम्ही त्यांना जाऊ देणार नाही. ज्ञानेश कुमारांच्या नंतर आम्ही त्यांना तुमच्या (मतदारांच्या) समोर उभे करू. मतचोरीच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.