Rajanand More
झारखंडमधील बडकागांव मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद सध्या चर्चेत आहेत. त्या केवळ 36 वर्षांच्या आहेत.
कथित जमीन घोटाळाप्रकरणी काही दिवसांपुर्वीच अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. ती नाकारण्यात आल्याने ईडीचे धाडसत्र सुरू असल्याचा अंबा प्रसाद यांचा आरोप.
लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्याची तयारीही भाजपने केली होती. पण त्यालाही नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
झारखंड विधानसभेत सर्वात तरूण आमदार म्हणून प्रसिध्द. माजी मंत्री योगेंद्र साव यांच्या कन्या. आईही होत्या आमदार.
वडिलांवर माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप होते. तसेच इतर काही आरोपांमध्येही ते काहीकाळ तुरुंगात होते.
एका गोळीबाराच्या प्रकरणात पोलिसांनी आई निर्मला देवी यांना तडीपार केले होते. त्यानंतर अंबा प्रसाद यांना 2019 मध्ये विधानसभेची उमेदवारी.
अंबा प्रसाद यांनी 2017 मध्ये विधी शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. घरात राजकीय वारसा असल्याने राजकारणातच सक्रीय.
अंबा प्रसाद या कोट्यधीश नाहीत. 4.74 लाख रुपयांच्या त्या मालकीण आहेत. तर 3.80 लाख रुपयांचे सोने आहे.