Vijaykumar Dudhale
उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रानुसार खासदार संजयकाका पाटील यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ही 48 कोटी 31 लाख 39 हजार इतकी आहे.
सांगलीतून तिसऱ्यांदा नशीब आजमावणाऱ्या संजयकाका पाटील यांची संपत्ती गेली पाच वर्षांत 29 कोटी रुपयांनी वाढली आहे.
संजयकाका पाटील यांच्याकडे विविध बॅंका, कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांचे एकूण 53 कोटी 02 लाख 52 हजार रुपयांचे कर्ज आहे
खासदार पाटील यांच्याकडे जंगम मालमत्ता 2 कोटी 48 लाख 45 हजार इतकी आहे, तर स्थावर मालमत्ता 45 कोटी 82 लाख 93 हजार इतकी आहे. उत्पन्नाचा स्त्रोत त्यांनी शेती आणि व्यवसाय असल्याचे म्हटले आहे.
संजयकाका पाटील यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 45 कोटी 82 लाख 93 हजार रुपये होती. म्हणजे गेल्या पाच वर्षांत पाटील यांची संपत्ती 29 कोटी रुपयांनी वाढली आहे.
संजय पाटील यांच्याकडे दहा लाख रुपयांचे, तर त्यांची पत्नी ज्योती यांच्याकडे 24 लाख रुपयांचे सोने आहे.
खासदार संजय पाटील यांच्या पत्नी ज्योती यांनी जंगम मालमत्तेपैकी 32 कोटी, 31 लाख रुपये एसजीझेड ॲन्ड एसजीए शुगर कंपनी तुरचीला दिले आहेत.
संजयकाका पाटील यांच्या नावावर एकही गाडी नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.