सरकारनामा ब्यूरो
राजस्थान निवडणुकीत भाजपच्या विजयामुळे गेहलोत सरकारला मोठा धक्का बसला आहे.
पराभवाची नक्की काय कारणे आहेत?
गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामुळे पक्षात विभागणी झाली.
मोदींनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. मात्र, गेहलोत हे एकटेच प्रचार करताना दिसून आले.
भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान कन्हैयालाल खून प्रकरणाचा मुद्दा प्रभावीपणे धरून ठेवल्यामुळे त्याचे दुष्परिणाम गेहलोत यांना पराभवात मोजावे लागले.
अशोक गेहलोत यांनी चिरंजीवी योजना सुरू केली. मात्र, गेहलोतांकडून योजनेकडे दुर्लक्ष झाले.
काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली तेच दुसरीकडे भाजपने याचा फायदा घेत आपला विजय मिळवला.