सरकारनामा ब्यूरो
भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी 12 वर्षे राष्ट्रपतीपद भूषविले
कोलकाता विद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी बीए, एमए, बीएल आणि एमएल अशा विषयांत पदव्या प्राप्त केल्या आहेत.
प्रसाद यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून काम केले आहे.
भारतातील पहिली विद्यार्थी संघटना बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
वकिलीत डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांची सिनेट अँड सिंडिकेट ऑफ पटणा विद्यापीठाचे पहिले सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
शिक्षक पदावरून निवृत्ती होत, त्यांनी 1911 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
1950 मध्ये त्यांची पहिल्यांदा राष्ट्रपती पदावर निवड झाली.
राजेंद्र प्रसाद यांना देशाचा सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे.