सरकारनामा ब्यूरो
काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबईचे माजी महापौर मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत.
मुंबई येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी बोस्टन विद्यापीठातून एमबीएची पदवी प्राप्त केली.
देवरा हे लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य आहेत.
संरक्षण मंत्रालयातील सल्लागार समिती आणि स्थायी समितीचे ते सदस्य अहेत.
बीएमसी येथील स्त्रॉम वॉटर ड्रेन प्रकल्पाच्या पुनर्रचनेत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
वयाच्या 27 व्या वर्षी त्यांची मुंबईचे खासदार म्हणून निवड झाली होती.
मुंबईच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
देवरा यांनी शहरी विकासाबरोबर पर्यावरण आणि वन विकासावर तितकाच भर दिला.