सरकारनामा ब्यूरो
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
राहुल गांधी दिल्लीतील गिरीनगरातील हनुमान मंदिर येथील भाजी मंडईमध्ये गेले होते.
भाजी विक्रेत्यांशी संवाद साधत यावेळी भाज्यांचे भाव किती आहेत याची चौकशी त्यांनी केली.
तसेच मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलांशी महागाईबाबत चर्चाही केली.
राहुल गांधीनी भाजी विक्रेत्याला लसूण किती रुपयांचा आहे असं विचारलं. त्यावेळी विक्रेत्यांनी 40 रुपये सांगितल्यावर ते म्हणतात की, 40 रुपयांचा लसूण 400 रुपयांना झाला आहे.
BJP सरकारला टोला लावत ते म्हणाले, वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे बजेट बिघडवले आहे आणि सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे.
यावेळी एक महिला राहुल यांना सांगत आहेत की, पगार तर कुणाचा वाढला नाही. पण भाव वाढले आहेत आणि ते कमी होण्याचे नाव घेत नाहीत, पुढे किती वाढतील तेही सांगता येत नाही.
महागाई का वाढत आहे, असे एका महिलेला राहुल यांनी विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, सरकारचं जनतेकडे अजिबात लक्ष नाही. सर्वसामान्य लोक काय खाणार, यावर त्यांंचं लक्ष नाही.