सरकारनामा ब्यूरो
तुम्हाला माहिती आहे का? नोबेल पुरस्कार का आणि कोणाला दिला जातो. जाणून घेऊयात.
अल्फ्रेड नोबेल यांच्या निधनानंतर नोबेल पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
अल्फ्रेड यांच्या मृत्यूपत्रात असे लिहिले आहे की, हा पुरस्कार त्या लोकांना देण्यात यावा ज्यांनी मानवजातीला सर्वात जास्त फायदा मिळवून दिला आहे.
1901 मध्ये पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
ऑक्टोबरच्या महिन्याच्या सुरुवातीला, नोबेल समिती या पुरस्कारासाठी विजेत्यांची नावांची निवड करते.
नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, विज्ञान, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या 6 श्रेणींसाठी दिला जातो.
'गीतांजली' या काव्य पुस्कासाठी 1913 ला रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला. ते भारतातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळला.
2024 मध्ये रोजी डेव्हिड बेकर, डेमिस हॅसाबिस आणि जॉन जम्पर यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.