सरकारनामा ब्यूरो
दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांचे खरे नाव राजेश्वर प्रसाद बिधुरी होते.
राजकारणात सक्रिय असूनही त्यांचे संपूर्ण कुटुंब जनसेवेला समर्पित आहे, राजस्थानमध्ये आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.
खासदार अन् केंद्रीय मंत्री असूनही बिधुरी यांनी देशाचा शेतकरी नेता म्हणून नाव लौकिक केलं.
वडिलांच्या निधनानंतर शिक्षण घेत गुरांचा व्यवसाय केला आणि घरोघरी जाऊन दूध विकण्याचे काम ते करायचे.
भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय हवाई दलाच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावली होती, यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
भरतपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदार बनले. त्यानंतर दौसामधूनही अनेक वेळेस खासदार म्हणून निवडून आले.
पायलट यांनी तब्बल 20 वर्षे खासदार पदाचा कारभार सांभाळला.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवले.
पायलट यांचे पुत्र सचिन पायलट राजकारणात राजकीय वारसा पुढे चालवत आहेत.
R