Deepak Kulkarni
शशी थरूर हे काँग्रेसचे मुत्सद्दी नेते असून त्यांची ओळख लेखक म्हणून आहेत.
ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत आणि केरळमधील तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
शशी थरूर त्यांच्या इंग्रजी भाषेतील कौशल्यासाठी आणि प्रभावी वक्तृत्वासाठी ओळखले जातात.
शशी थरूर यांच्या 'Our Living Constitution' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात थरूर यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असं मोठं विधान केले आहे.
पण नेहरु यांनी आरक्षणाला विरोध करतानाच UCC अर्थात समान नागरी कायदा आवश्यक आहे, असं सांगितल्याचंही थरुर म्हणाले.
याच कार्यक्रमात शशी थरुर यांनी उत्तराखंडच्या UCC कायद्यातील काही कलमे हास्यास्पद असल्याचा दावा केला आहे.
शशी थरूर यांच्या पुस्तक प्रकाशनाला माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हेही उपस्थित होते.