Rashmi Mane
मुंबई लोकल प्रवासासाठी आता आणखी एक डिजिटल सुविधा – लवकरच व्हॉट्सअॅपवरूनही रेल्वे तिकीट काढता येणार!
दररोज लाखो मुंबईकर लोकलने प्रवास करतात. या प्रवासात अधिक सुविधा देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
भारतीय रेल्वे 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत तिकीट प्रणाली अधिक स्मार्ट आणि जलद करण्यावर भर देत आहे.
रेल्वे चॅट बेस तिकीट प्रणाली आणणार असून, व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा लवकरच सुरु होणार आहे.
आत्ता 25% प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढतात – अॅप, क्यूआर कोड इत्यादींचा वापर वाढतोय.
या नव्या प्रणालीसाठी पश्चिम रेल्वेला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आलं आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे.
मेट्रोसाठी व्हॉट्सअॅपवरून तिकीट घेता येते. मेट्रोप्रमाणेच रेल्वे तिकिटासाठीही व्हॉट्सअॅपवरून प्रक्रिया शक्य होणार आहे. त्यामुळे काऊंटरच्या रांगा कमी होण्यास मदत मिळेल.