सरकारनामा ब्यूरो
नाशिकचे दिवंगत वसंत साठे हे स्वत:चे मत ठामपणे मांडणारे काँग्रेसच्या मुख्य नेत्यांपैकी एक होते.
वयाच्या १७ व्या वर्षात स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित झाले. त्यानंतर प्रजा सोशालिस्ट पार्टी (PSP) मधून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
60 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हापासूनच ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मेमोयर्स ऑफ अ रॅशनलिस्ट या आत्मचरित्रासह अर्धा डझनहून अधिक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या अकोला येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आल्यानंतर विदर्भातून ते खासदार राहिले.
आणीबाणीच्या काळात विजयी झालेल्या काँग्रेस नेत्यांपैकी ते काँग्रेस संसदीय पक्षाचे उपनेते होते.
व्यवसायाने वकील राहिलेले साठे हे सरकारमध्ये असूनही कायम नियमाला धरून काम करत होते.
इंदिरा गांधी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री असताना आशियाई क्रीडा स्पर्धेवेळी त्यांनी भारतात पहिला रंगीत टीव्ही सुरू करून अनोखे कार्य केले.
R