Deepak Kulkarni
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी नड्डांचा राजीनामा स्वीकारला आहे.
नड्डा यांना गुजरातमधून नुकतीच भाजपनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली होती.
या ठिकाणी भाजपचे चारही उमेदवार नुकतेच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये नड्डा यांचाही समावेश आहे.
त्यामुळं साहजिकचं त्यांनी आधीच्या राज्यसभा निवडणुकीचा राजीनामा दिला आहे.
जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
लोप्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त वक्तव्यांपासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते, अशी नड्डांची ओळख आहे.
मूळचे हिमाचल प्रदेशचे आणि बिहारमध्ये जन्मलेले त्यांचा भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात मोठा वाटा आहे. पाटणामध्ये २ डिसेंबर १९६० ला त्यांचा जन्म झाला.
पंतप्रधान नरेंंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सलग दुसऱ्यांदा नड्डांवर पक्षाची जबाबदारी सोपवली आहे.
R