Rashmi Mane
आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यातील 288 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
सकाळपासून राज्यात नागरिक मतदानासाठी बाहेर पडले असून राजकीय नेते मंडळी, कला विश्वातील कलाकार, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे.
राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावत नागरिकांनीही जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन जनतेला केले आहे.
नेत्यानी मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत,
मतदान करणे हा आपला केवळ अधिकारच नाही तर ते आपले राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे असा संदेशही यावेळी देण्यात येत आहे.
राज्यात सध्या दुहेरी लढच होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता कोणाला कौल देते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.