Aslam Shanedivan
केरळमधील डाव्यांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एका महत्त्वाच्या पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या तिरुवनंतपुरम महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
या पराभवामुळे भाजपाचे स्वप्न धुळीस मिळाले असून सत्ता टिकवण्यासाठी अपक्ष नगसेवकांच्या पाठिंबा लागणार आहे.
तिरुवनंतपुरमच्या झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने १०१ प्रभागांपैकी ५० जागांवर दणदणीत विजय मिळवला होता.
सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला २९ आणि काँग्रेसच्या संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) १९ जागा मिळाल्या होत्या. उर्वरित दोन जागांवर अपक्ष विजयी झाले होते.
यादरम्यान विझिंजम प्रभागाचे अपक्ष उमेदवार जस्टिन फ्रान्सिस यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने या प्रभागासाठी पोटनिवडणूक आता झाली.
महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी ही पोटनिवडणूक महत्वाची होती. ज्यात काँग्रेसने विजय मिळवला. ज्यामुळे आता काँग्रेसचे संख्याबळ २० वर पोहोचले असून
या अटीतटीच्या तिरंगी लढतीत यूडीएफचे के.एच.सुधीर खान यांनी २,९०२ मते घेत भाजपच्या एन.ए.नौशाद यांचा अवघ्या ८३ मतांनी पराभव केला.