सरकारनामा ब्यूरो
बळवंत वानखडे हे 2005 ते 2010 पर्यंत ग्रामपंचायत सदस्य (सरपंच,लेहगाव ता.दर्यापूर ) होते.
अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य व वित्त विभागाचे वानखेडे हे सभापती होते.
दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक (2005ते 2020)म्हणून ते कार्यरत होते.
2009 मध्ये त्यांनी दर्यापूर विधानसभा लढवली, यात त्यांचा पराभव झाला. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
आरपीआय गवई गटातर्फे त्यांनी2014ची विधानसभा लढवली, त्यात पराभव झाला, त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
काँग्रेस पक्षातर्फे 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती, जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने ते विजयी झाले.
शेतकरी कुटुंबियातील वानखडे हे शांत आमदार म्हणून अमरावतीत परिचित आहेत.
ग्रामपंचायत सदस्य ते आमदारपर्यंत असा त्यांचा राजकीय प्रवास. आता ते लोकसभेच्या रिंगणात आहेत.
NEXT: भाजपच्या 'निवडणूक जाहीरनामा' समितीत 'या' बड्या नेत्यांचा समावेश!