Pradeep Pendhare
सुरूपसिंह नाईक आणि शालिनीताई पाटील या राज्यातील काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांचं अलीकडेच निधन झालं असून, या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा होती.
वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात 1983 मध्ये सरकार स्थापन झाले. त्यावेळी इंदिरा गांधींनी सुरूपसिंह नाईक यांच्या नावाची विचारणा केली होती.
बॅ. अंतुले यांच्यामुळे राज्यात पहिला मुस्लिम मुख्यमंत्री झाला, तर नाईक यांच्या रुपाने पहिला आदिवासी मुख्यमंत्री करण्याची इंदिरा गांधींची योजना होती.
इंदिरा गांधी यांची हत्या झाली अन् राजीव गांधी यांनी प्रस्थापित मराठा नेत्यांकडेच नेतृत्व कायम ठेवले. शालिनीताई पाटील यांचीही राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी होती.
बॅ. अंतुले व शालिनीताई पाटील यांच्या वादात विकोपाला गेले, पुढे अंतुलेंनी शालिनीताईंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.
रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसकडून शालिनीताई पाटील आणि कन्हैयालाल गिडवाणी यांच्यावर जबाबदारी दिली.
हेगडे सरकार पाडून त्याचे श्रेय घ्यायचे व मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करायची, ही शालिनीताईंची खेळी होती.
पैशाचे वाटपाचा आरोप, बंगळूरच्या हाॅटेलमधून पैसे जप्त झाले, त्यामुळे शालिनीताईंचा हेडगे सरकार पाडण्याचा प्रयत्न फसला.