Pradeep Pendhare
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी एकूण 23 परदेश दौरे केले आणि या दरम्यान त्यांनी भारतीय हितसंबंधांना समोर ठेवले.
पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी 2025मध्ये फ्रान्सच्या भेटीने त्यांच्या परदेश दौऱ्याची सुरुवात केली आणि नंतर ओमानला भेट दिली.
12 ते 13 फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर जात पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय व्यापारावर चर्चा केली.
11-12 मार्चला मॉरिशस, तीन-चार एप्रिलला थायलंड, चार ते सहा एप्रिलला श्रीलंका, 22 एप्रिलला सौदी अरेबिया, 15 ते 16 जूनला सायप्रसला दौरा केला.
16 ते 17 जूनला कॅनडाचा पंतप्रधान मोदींनी पहिला दौरा करत, तिथं कनानास्किस इथं झालेल्या G7 शिखर परिषदेत भाग घेतला.
18 जूनला क्रोएशियाला दौरा, दोन ते तीन जुलैला पहिला घाना दौरा, तीन ते चार जुलैला रिनिदाद आणि टोबॅगोचा दौरा आणि चार ते पाच जुलैला अर्जेंटिनाचा दौरा केला.
पाच ते आठ जुलैला पंतप्रधान मोदी ब्राझीलला भेट दिली. ब्रिक्स देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला, विशेष म्हणजे चीन देखील ब्रिक्सचा एक भाग आहे.
नऊ जुलैला नामिबिया, 23 ते 24 जुलैला युके, 25 ते 26 जुलैला मालदीवचा आणि 29 ते 30 ऑगस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी जपान दौरा केला.
31 ऑगस्ट ते एक सप्टेंबरला पंतप्रधान मोदी 2018नंतर पहिल्यांदाच चीनला भेट दिली. पंतप्रधानांनी 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले.Modi foreign visits
11 ते 12 नोव्हेंबरला मोदींनी भूतानला भेट दिली. 21 ते 23 नोव्हेंबला दक्षिण आफ्रिकेला भेट देत G20 शिखर परिषदेत सहभाग घेतला.
15 ते 16 डिसेंबरला पंतप्रधान मोदी जॉर्डनला भेट दिली. यानंतर 16 ते 17 डिसेंबरला इथिओपिया दौरा, 17 ते 18 डिसेंबरला ओमान दौरा केला.