Congress : काँग्रेसने दावा केलेले सोलापूर जिल्ह्यातील 'ते' सात मतदारसंघ

Vijaykumar Dudhale

अक्कलकोट

मागील निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघात काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांनी निवडणूक लढवली होती. आघाडीच्या काळातही तो मतदारसंघ काँग्रेसकडे होता.

Congress | Sarkarnama

दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी मागील निवडणूक लढवली होती.

Congress | Sarkarnama

सोलापूर शहर उत्तर

सोलापूर शहर उत्तर हा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे गेलेला आहे. मात्र, आता त्यावर काँग्रेसने दावा केलेला आहे.

Congress | Sarkarnama

सोलापूर शहर मध्य

खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभा विजयाची हॅटट्रीक केली आहे. काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात राहावा, असे काँग्रेसजणांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडीत या मतदारसंघावर माजी आमदार नरसय्या आडम यांनीही दावा केला आहे.

Congress | Sarkarnama

पंढरपूर

मागील विधानसभा निवडणुकीत (स्व.) आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर पंढरपूरमधून विजय मिळविला होतो. तोही मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी सोलापूरमधील पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.

Congress | Sarkarnama

मोहोळ

मोहोळ मतदारसंघ हा पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. त्या ठिकाणी आतापर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे. या मतदारसंघातून लोकसभेला काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे, त्यामुळे काँग्रेसने मतदारसंघावर दावा केला आहे.

Congress | Sarkarnama

माढा

माढा विधानसभा मतदारसंघातून तब्बल सहा वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार बबनराव शिंदे निवडून आले आहेत. पण, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माढ्यावर दावा केला आहे.

Congress | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या चार मतदारसंघांवर डोळा

काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल चार मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते त्या मतदारसंघाबाबत काय निर्णय घेणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष आहे.

Congress | Sarkarnama

विनेश फोगाट काँग्रेसमध्ये; रेल्वेकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Vinesh Phogat | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा