Rajanand More
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला सर्वात मोठा झटका बसला. त्यांनी 2022 मध्ये सोडली काँग्रेस. जम्मू आणि काश्मीर डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाची स्थापना.
माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी 16 मे 2022 रोजी काँग्रेसची साथ सोडली. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश नाही. मात्र, समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
राहुल गांधी यांच्या टीमध्ये महत्वाचा चेहरा असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला मोठा झटका दिला. नंतर कमलनाथ सरकारची सत्ता घालवली.
माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते दिवंगत नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे दोनदा नेतृत्व. आज शिवसेनेत प्रवेश.
जितीन प्रसाद हेही राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील नेते होते. त्यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री.
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनिल जाखड यांनी विधानसभा निवडणुकीनंतर 2022 मध्ये राजीनामा दिला. मुख्यमंत्रिपदासाठी होते इच्छूक. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष.
माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग यांनी जानेवारी 2022 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी प्रियांका गांधींमुळे होते नाराज.
माजी केंद्रीय सरंक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांचा वर्षभरापुर्वी भाजपमध्ये प्रवेश. काँग्रेसला मोठा झटका होता.
गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलांचा मे 2022 मध्ये काँग्रेस सोडली. ते 2019 मध्ये पक्षात आले होते. सध्या भाजपचे आमदार.
गुजरात काँग्रेसचा दुसरा धक्का अल्पेश ठाकूर यांनी दिला. आमदारकीचा राजीनामा देत जुलै 2019 मध्ये भाजपात प्रवेश. सध्या गांधीनगर दक्षिण मतदारसंघातून आमदार.