Jagdish Patil
राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे इथे पोटनिवडणुकीत जाहीर झाली आहे.
भाजपने या निवडणुकीत प्रियांका गांधींच्या विरोधात नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण जंगम मालमत्ता 4,24,78,689 रुपये इतकी तर 138,992,515 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
याशिवाय त्यांच्याकडे होंडा सीआरव्ही कार आणि पती रॉबर्ट वड्रा यांच्याकडे 37,91,47,432 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
प्रियांका यांनी म्युच्युअल फंडात 2 कोटी 24 लाख 93 हजार रुपये गुंतवले आहेत. तर त्यांच्यावर 15 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज आहे.
प्रियांका यांच्याकडे 4.41 किलोचे दागिने, 2.5 किलो सोने आणि 59.83 किलो चांदीच्या वस्तू आहेत.
2 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त किमतीची जमीनीसह 7.774 कोटी रुपयांचे घर आणि पतीच्या नावावर 27.64 कोटींच्या व्यावसायिक इमारती आहेत.