Congress Vs Vishwas Nangare Patil : काँग्रेसने विचारले सहा प्रश्न, CM फडणवीस, IPS नांगरे पाटील उत्तर देणार का?

Roshan More

विश्वास नांगरे पाटलांचे स्पष्टीकरण

सकल हिंदू समजाच्या मंचावर जात भाषण केल्यानंतर वादात सापडलेल्या IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले होते.

Vishwas Nangare Patil | Sarkarnama

काँग्रेसचा अविश्वास

आपण कुठल्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या उत्तरानंतरही काँग्रेसने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत सोशल मीडियामधून त्यांना सहा प्रश्न विचारले आहेत.

Vishwas Nangare Patil | Sarkarnama

पूर्वपरवानगी होती की मर्जी?

सदर खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गृह विभाग किंवा राज्य सरकारची रीतसर पूर्वपरवानगी घेतली होती का; आणि नसल्यास नियमांच्या उघड उल्लंघनाबद्दल सरकार काय कारवाई करणार?

Vishwas Nangare Patil | Sarkarnama

Rule 3(1) ची पायमल्ली का केली?

पोलीस दलातील जबाबदार अधिकाऱ्याने कायद्याचे रक्षक म्हणून राहण्याऐवजी, विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिच्या विचारसरणीचे जाहीर उदात्तीकरण करणे पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे आहे का?

IPS-Vishwas-nangre-patil | Sarkarnama

राजकीय तटस्थता की राजकीय निष्ठा?

सेवा नियमांनुसार राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक असताना, संघाच्या मंचावरून कौतुक करणे ही 'तटस्थता' आहे की विशिष्ट विचारप्रवाहाशी जाहीर निष्ठा (Political Loyalty) व्यक्त करणे आहे?

CM Devendra Fadnavis IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

संविधान सर्वोच्च की संघ विचार?

संविधानाच्या सर्वोच्चतेशी बांधील असणाऱ्या संवैधानिक पदावरील अधिकाऱ्याने, एका विशिष्ट विचारधारेच्या मंचावर जाऊन तिचे जाहीर गुणगान करणे हा थेट संविधानाचा अवमान नाही का?

IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

प्रभावाखाली जाण्याची शंका

सार्वजनिक मंचावरून विशिष्ट विचारधारेचा गौरव करणाऱ्या अधिकाऱ्याकडून, उद्या कायदा-सुव्यवस्था राखताना किंवा निर्णय घेताना पूर्वग्रहदूषित वर्तन होणार नाही याची खात्री महाराष्ट्राला कोण देणार?

IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

कायदेशीर प्रश्न

राजकारणात भाग घेणाऱ्या संघटनेशी कोणत्याही प्रकारे 'संबंधित' राहण्यास नियमाने बंदी असताना, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बनून गुणगान करणे हा सेवा नियमांचा थेट भंग मानला जाणार नाही का?

CM Devendra Fadnavis IPS Vishwas nangre patil | Sarkarnama

NEXT : सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई

Farmers Compensation
येथे क्लिक करा