Aslam Shanedivan
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे
मार्च- एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाच्या नुकसानीसाठी ३३४ कोटी ९८ लाख रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत.
त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार असून विशेषतः कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, 'अल निनो'च्या प्रभावामुळे यंदा राज्यात तुटीच्या पावसाचा अंदाज असून, संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी विभागीय आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून तब्बल साडेसोळा हजार कोटी रुपयांची मदत बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे.
मदत व पुनर्वसन विभागाकडे पंचनामे आणि प्रस्ताव विभागाकडे सादर झाल्यानंतर एकाच दिवसात या मदतीला मान्यता दिली गेलीय.
तसेच, 'महायुती सरकार येण्यापूर्वीची जुनी प्रलंबित असणारी सुमारे ५,००० कोटी रुपयांची मदतही या सरकारने शेतकऱ्यांना दिल्याचे मकरंद पाटील यांनी म्हटले आहे