Roshan More
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग येथून सद्भावना यात्रेच प्रारंभ झाला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सोशल मीडियातून सांगितले की, सद्भावना पदयात्रेचा मुख्य उद्देश समाजात एकता, सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुर्नस्थापना करणे आहे.
समाज एकत्र आणण्याचा वसा, सद्भावनेच्या मार्गाने पुढे जाण्याचा संकल्प आहे.
मस्साजोगे येथून सद्भावना पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचे सांत्वन केले.
सद्भावना पदयात्रेत धनंजय देशमुख, वैभवी देशमुख सहभागी झाले.
यात्रेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी यांना अभिवादन करत सद्भावना यात्रेस प्रारंभ झाला.
मस्साजोगे येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा विविध गावांमधून जात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेला एकत्र आणण्याचे कार्य करेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.