Jagdish Patil
जगभरात आज महिला दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने आपण लोकप्रिय महिला IAS ची माहिती जाणून घेणार आहोत.
स्मिता सभरवाल यांना जनतेच्या अधिकारी या नावाने ओळखलं जातं. त्या पहिल्या सर्वात तरुण महिला IAS असून UPSC मध्ये त्यांनी देशात चौथी क्रमांक मिळवला होता.
सर्जना यादव 2019 च्या महिला IAS अधिकारी आहेत. त्यांनी नोकरी करतच सेल्फ स्टडीच्या करून अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
परी बिश्नोई या राजस्थानमधील असून बिश्नोई समाजातील त्या पहिल्या महिला IAS आहेत. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी मोठं यश मिळवलं.
2018 साली संपूर्ण देशात 5 वा क्रमांक मिळवत सृष्टी देशमुख या UPSC उत्तीर्ण झाल्या. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC क्रॅक केली.
टीना डाबी या 2015 साली UPSC मध्ये प्रथम क्रमांक मिळवून IAS अधिकारी बनल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनीUPSC परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला.
IAS प्रियांका गोयल यांना 5 वेळा UPSC परीक्षेत अपयश आलं. मात्र, शेवटच्या प्रयत्नात त्या IAS अधिकारी बनल्या.
फेमस IAS अधिकारी टीना डाबीची लहान बहीण असलेल्या रिया डाबी या UPSC मध्ये संपूर्ण देशात 15 वी रँक मिळवत राजस्थान केडरच्या आयएएस अधिकारी बनल्या.
मूळच्या तेलंगणाच्या असलेल्या बी. चंद्रकला यांनी 2008 साली UPSC मध्ये 409 वी रँक मिळवली. बुलंदशहरच्या जिल्हा अधिकारी म्हणून भ्रष्टाचारविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात.