Aslam Shanedivan
नुकताच राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला. ज्यात अकोला जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि एका नगरपंचायतींचा समावेश आहे.
तर राज्यातील तब्बल 120 हून अधिक नगरपालिकेवर भाजपने कमळ फुलवले असून येथे भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. काँग्रेसने 40 नगरपालिकांवर आपली सत्ता आणली आहे.
सन 1934 मध्ये बाळापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून येथे गेल्या 65 वर्षांपासून खतीब घराण्याची सत्ता आहे. पण यंदा काँग्रेसने सत्तेला सुरूंग लावलाय.
तर डॉ.आफरीन परवीन मोहम्मद जमीर या तिशीतील तरुणीने इतिहास घडवत नगराध्यक्ष पदावर नाव कोरले आहे
त्यांचा 1927 मतांनी विजय झाला असून 25 सदस्यांच्या नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसने 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्या चार पिढ्यातील सदस्य बाळापूरचे नगराध्यक्ष राहिले असून यंदाही नातिकोद्दीन खतीब यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष रजीया बेगम खतीब नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या.
डॉ. आफरीन यांचे बीएचएमएस झाले आहे. सध्या त्या बाळापुरात मेडीकल प्रॅक्टिस करत असून त्यांचे वडील मोहम्मद जमीर उर्फ जम्मूसेठ यांनी नगराध्यक्षपद भूषवलं होत.