Maharashtra Election Results: 'हे' ठरले महाराष्ट्रातील सर्वात थरारक निकाल...! बोटावर मोजण्याइतपत मतानं कोण जिंकलं, कोण हरलं?

Deepak Kulkarni

निवडणुकांचा निकाल

राज्यातील सुमारे पाच वर्षांपासून रखडलेल्या 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडल्या. यात पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला 263 नगरपालिका तर उर्वरित 23 नगरपरिषदांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान झाले. अखेर रविवारी 21 डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या

Nagar Parishad Nagar Panchyat Election | Sarkarnama

महायुतीचा डंका...

या निवडणुकीत महायुतीनं 288 पैकी 221 जागांवर विजय मिळवला. तर एकट्या भाजपनं 117 जागा जिंकल्या तर शिवसेना 61 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागा मिळाल्या.

Mahayuti | Sarkarnama

निसटता विजय- पराभव

या निवडणुकीत काही उमेदवारांचा निसटता विजय तर कुणाचा निसटता पराभव झाला. यात पालघरमधील वाडा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपच्या सिद्धी भोपतराव या अवघ्या एका मतानं विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार प्रिया गंधे यांचा पराभव केला.

Siddhi Bhopatrao | Sarkarnama

वडगाव नगरपंचायत

पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीत एकदम चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता राहुल ढोरे या अवघ्या एका मतानं विजयी झाल्या आहेत.

Sunita Dhore | Sarkarnama

पाचगणीत धक्कादायक निकाल

पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. या नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बगाडे यांनी उमेदवार संतोष कांबळे यांचा केवळ दोन मतांनी पराभव केला आहे.

Pachgani Nagardhayksha | Sarkarnama

गडचिरोलीत एका मतानं भाजपला धक्का

गडचिरोली नगर परिषदेची निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसच्या एका उमेदवाराने दाखवून दिले आणि भाजपचेच गणित बिघडवले. काँग्रेसच्या श्रीकांत देशमुख यांनी भाजपच्या संजय मांडवगडे यांच्यावर एका मतानं विजय मिळवला आहे.

Shrikant Deshmukh | Sarkarnama

भद्रावती नगर परिषद निवडणूक

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत वृषाली पांढरे यांनी काँग्रेस उमेदवाराला एका मताने पराभूत केले.

Vrushali Pandhare | Sarkarnama

नळदुर्ग नगरपालिकेत काँटे की टक्कर

नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सहामधील काँग्रेसच्या महिला उमेदवार मन्नबी कुरेशी यांना 405 मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार तयबा कादरी यांना 404 मते पडली. त्यामुळे केवळ एक मताने विजयी झालेल्या मन्नबी कुरेशी यांनी गुलाल उधळला.

Manabbi kureshi | Sarkarnama

पाच मतांच्या फरकानं पराभव

त्यानंतर नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुमन ठाकूर यांना 569 मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसच्या उमेदवार मुशरबी शेख यांना 564 मते मिळाली. या ठिकाणी केवळ पाच मतांच्या फरकाने ठाकूर या विजयी झाल्या.

Suman Thakur | Sarkarnama

चार मतांच्या फरकानं पराभव

याच निवडणुकीत तीन वेळेस नगरसेवक राहिलेल्या भाजपचे उमेदवार निरंजन राठोड यांना 584 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दत्ता राठोड यांना 580 मते मिळाली. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या राठोडांना चार मतांच्या फरकानं विजयी झाले.

Niranjan Rathod | Sarkarnama

आठ मतानं मिळवला विजय

नळदुर्गच्या निवडणकीत आणखी एक थरारक निकालाची नोंद होताना भाजप उमेदवार छमाबाई राठोड यांना 535 मतं तर काँग्रेसच्या रेश्मा पवारांना 527 मतं मिळाली. या ठिकाणी छमाबाईंचा निसटत्या आठ मतानं विजय झाला.

Chhamabai Rathod | Sarkarnama

NEXT: आरारारा...खतरनाक ! राज्यात विक्रमी मतानं जिंकलेला नगराध्यक्ष, तब्बल 42 हजारांचं लीड; कोण आहे उमेदवार?

Amol-Mohite-Satara.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...