Nana Patole News : 'विठ्ठल...विठ्ठल जय हरी विठ्ठल'च्या गजरात, नाना पटोलेही झाले तल्लीन!

Mayur Ratnaparkhe

विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा, अशी प्रार्थना केली.

यानंतर आषाढी वारी निमित्त नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळा नाना पटोले वारकऱ्यांसह विठूरायाच्या जयघोषात तल्लीन झाले

नाना पटोले यांनी तुकोबारायांच्या पालखीच्या बैलगाडीचेही सारथ्य केले.

तर वारकऱ्यांसह दिंडीत सहभागी होत टाळ मृदंगाच्या गजरात ठेकाही धरला.

नाना पटोले यांनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत विठ्ठल नामाचा गजर केला.

नाना पटोलेही वारकरी वेशात यावेळी दिसून आले.

नाना पटोलेंचा मंदिरात तुळशीमाळ घालून आणि फेटा बांधून सत्कार केला गेला.

Next : होय होय वारकरी...पाहे पाहे रे पंढरी

येथे पाहा