Pradeep Pendhare
काँग्रेसच्या मत चोरीच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोग चर्चेत असून, सर्वात अवघड कामावर आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी भाष्य केलं आहे.
भारतातील निवडणुकीत मतदार याद्या अद्ययावत करणं हे जगातील सर्वात अवघड आणि चॅलेंजवालं काम असल्याचे ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे.
1960 पासून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत मतदार याद्या अपडेट केल्या जात आहेत. यात दावे, हरकती आणि अपिलांची तरतूद आहे.
काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर निवडणुकीत गैरप्रकारासाठी मतदारांच्या डेटामध्ये फेरफार केल्याचा आरोप केल्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी ही प्रतिक्रिया दिली.Gyanesh Kumar
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत देशभरात निवडणूक विश्वासार्हता राखण्यात या मजबूत यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर राजकीय पक्ष, उमेदवार, पोलिस, खर्च निरीक्षक आणि माध्यमे बारकाईने लक्ष ठेवतात.
निवडणूक आयोग जगातील सर्वात मोठी संघटना बनल्याचा दावा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केला.
निवडणूक कर्मचारी, पोलिस दल, निरीक्षक आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अशा 2 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसह निवडणूक आयोग जगातील सर्वात मोठी संघटना बनला आहे.
ही संघटना अनेक राष्ट्रीय सरकारे आणि प्रमुख जागतिक कंपन्यांच्या एकत्रित कामगार संख्येपेक्षा जास्त मोठी आहे.
भारतातील जवळजवळ एक अब्ज मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क मुक्तपणे बजावता आला पाहिजे, अशी भावना देखील ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केली.