Vijaykumar Dudhale
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.
सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख तथा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी हे विधानसभेसाठी दक्षिण सोलापूरमधून इच्छूक असल्याची चर्चा आहे.
उद्योजक महादेव कोगनुरे हेही दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. उमेदवारीची मागणी करणारा अर्ज त्यांनी काँग्रेस पक्षाकडे सादर केला आहे.
काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनीही दक्षिण सोलापूरमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली आहे.
मागील 2019 ची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढणारे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या प्रणिती शिंदे दक्षिण सोलापूरमधून विधानसभेसाठी कोणाला उमेदवारी देतात, हे पाहावे लागेल. त्यांची शिफारस महत्वाची ठरणार आहे.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी विधानसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात घालतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे