AARTI : अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त 'आर्टी'ची स्थापना, संस्थेची नेमकी उद्दिष्टे काय?

Jagdish Patil

आर्टी कार्यालयाचे उद्‌घाटन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आर्टी कार्यालयाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते झालं

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit pawar | Sarkarnama

'आर्टी'ची स्थापना

राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, विकास करण्यासाठी 'आर्टी'ची स्थापना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Eknath Shinde | Sarkarnama

वेबपोर्टल

'आर्टी' संस्थेच्या वेबपोर्टलचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. तर या संस्थेची नेमकी उद्दीष्ट काय असणार आहेत ते जाणून घेऊ.

AARTI Web Portal | Sarkarnama

मातंग समाज

मातंग समाजातील मुले देखील उच्च शिक्षण घेऊन सनदी अधिकारी व्हावीत यासाठी राज्य सरकारने 'आर्टी' ची स्थापना.

AARTI Devendra Fadnavis | Sarkarnama

रोजगारनिर्मिती

संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्ट-अप, रोजगारनिर्मिती आदी विषयक योजना राबवणे.

AARTI | Sarkarnama

साहित्याची प्रसिध्दी

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची प्रसिध्दी व संवर्धन करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर करणे.

Annabhau Sathe | Sarkarnama

चर्चासत्र

संस्थेच्या माध्यमातून सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद कार्यक्रम आयोजित करणे पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक निबंध प्रकाशित करणे.

Annabhau Sathe Aarti | Sarkarnama

आंतरराष्ट्रीय परिषद

तसेच कला, कौशल्य यांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरविणे ही आर्टीची उद्दिष्टे असणार आहेत.

AARTI Annabhau Sathe | Sarkarnama

NEXT : कर्तव्यदक्ष IAS घडवणारी संस्था LBSNAA

research and training institute on public policy and public administration in India. | Sarkarnama
क्लिक करा