Himani Narwal : हाताला मेहंदी, गळ्यात ओढणी, सुटकेसमध्ये मृतदेह! कोण आहेत हिमानी नरवाल? काँग्रेसशी आहे कनेक्शन...

Rajanand More

हिमानी नरवाल

हिमानी नरवाल हा हरियाणातील काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांचा मृतदेह शुक्रवारी (ता. 28 फेब्रुवारी) एका सुटकेसमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. हाताला मेहंदी आणि गळ्यात ओढणी होती.

Himani Narwal | Sarkarnama

मतदानादिवशीच खून

हरियाणामध्ये रविवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होते. त्याआधीच हिमानी यांचा मृतदेह आढळून आल्याने या घटनेला राजकीय वळण मिळाले आहे.

Himani Narwal | Sarkarnama

जिल्हा उपाध्यक्ष

हिमानी या माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांचा गड असलेल्या रोहतकमधील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या. रोहतक ग्रामीणच्या त्या जिल्हा उपाध्यक्ष होत्या.

Himani Narwal | Sarkarnama

दहा वर्षांपासून सक्रीय

हिमानी या मागील दहा वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रीय होत्या. सोनीपतमधील कथूरा हे त्यांचे मूळ गाव आहे. काँग्रेसच्या विविध राजकीय तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा.

Himani Narwal | Sarkarnama

लोककलांचे सादरीकरण

विविध कार्यक्रमांमध्ये हरियाणवी लोककलाकारांसोबत हिमानीही सक्रीयपणे सहभागी होत असत. त्यासाठी त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

Himani Narwal | Sarkarnama

भारत जोडो यात्रा

हिमानी या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाल्या होत्या. राहुल यांच्यासोबतचा फोटो त्यांनी सोशल मीडियात शेअर केला होता.

Himani Narwal | Sarkarnama

एलएलबीचे शिक्षण

हिमानी यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, त्या सध्या एलएलबीचे शिक्षण घेत होत्या. नोकरी करण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती.

Himani Narwal | Sarkarnama

विधानसभेनंतर दूर

विधानसभा निवडणुकीनंतर हिमानी यांनी पक्षाचे काम करणे कमी केले होते, असे त्यांच्या आईने सांगितले. एक्स वरही त्यांनी काही महिन्यांपासून पोस्ट केलेली नाही.

Himani Narwal | Sarkarnama

NEXT : नामदेव ढसाळ कोण?

येथे क्लि करा.