Pradeep Pendhare
नामदेव लक्ष्मण ढसाळ मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते.
पुणे इथं 15 फेब्रुवारी 1949 रोजी जन्मलेले नामदेव ढसाळ यांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा प्रभाव असलेल्या नामदेव ढसाळांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखनातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली.
दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने करणाऱ्या या संघटनेने मराठवाडा विद्यापीठाच्या नाम विस्तारावर महत्त्वाची भूमिका बजावली.
नामदेव ढसाळ वयाच्या 64 व्या वर्षी आजारपणामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
नामदेव ढसाळ यांचे 11 कवितासंग्रह, पाच चिंतनपर लेखन, तीन कांदबरी आणि एका नाटकाचे लेखन केलेले आहे.
1999 मध्ये पद्मश्री पुरस्कारासह दहा विविध मानाच्या पुरस्कारांनी नामदेव ढसाळांचा सन्मान झालेला आहे. आता त्यांच्यावर Chal Halla Bol चित्रपट येतोय!