आमदार पाटलांची बातच न्यारी, पदाचा दोन महिन्यांत दोनदा राजीनामा

Rajanand More

आमदार पाटील

कर्नाटकातील इंडी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार यशवंतरायगौड पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्‍यांसह विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा धाडला आहे.

MLA Yashwanthraygoud Patil | Sarkarnama

कारण काय?

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मतदारसंघाचा समावेश करावा, अशी त्यांची मागणी आहे. सरकार दुर्लक्ष करत असल्याचे कारण देत त्यांनी थेट राजीनाम्याचे पाऊल उचलल्याने ते चर्चेत आले आहेत.

MLA Yashwanthraygoud Patil | Sarkarnama

दुसऱ्यांदा राजीनामा

आमदार पाटील यांचा मागील दोन महिन्यांतील हा दुसरा राजीनामा आहे. पक्षातील नेत्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी मागील राजीनामा मागे घेतला होता.

MLA Yashwanthraygoud Patil | Sarkarnama

मंत्रिपद नाही

कर्नाटकात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाटील यांना स्थान दिले नाही. त्यामुळे पक्षावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

MLA Yashwanthraygoud Patil | Sarkarnama

२०१३ पासून आमदार

पाटील हे इंडी मतदारसंघाचे २०१३ पासून आमदार आहेत. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यासाठी ते सातत्याने आक्रमक भूमिका मांडत आले आहेत.

MLA Yashwanthraygoud Patil | Sarkarnama

ज्येष्ठ नेते

आमदार पाटील हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या गटातील मानले जातात. त्यांनी अनेकदा पक्षातील नेत्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

MLA Yashwanthraygoud Patil | Sarkarnama

दबावतंत्र

पाटील यांनी राजीनामा देताना केवळ ताकदवान आणि दबावतंत्राचा वापर करणाऱ्या लोकांचीच कामे होत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. माझ्यासारख्या नेत्यांना इथे स्थान नसल्याचेही ते म्हणाले.

MLA Yashwanthraygoud Patil | Sarkarnama

आमदार भावनिक

आमदार पाटील हे भावनिक असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. कोणत्याही मतदारसंघाबाबत भेदभाव केला जात नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही निकष असल्याचेही ते म्हणाले.

MLA Yashwanthraygoud Patil | Sarkarnama

NEXT : मोबाईल रिचार्जमध्ये आता फक्त कॉल आणि SMSचा पर्याय; काय आहे TRAIचा आदेश?

येथे क्लिक करा.