Rajanand More
इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोठा दिलासा दिला आहे. दूरसंचार कंपन्यांना इंटरनेटशिवाय मासिक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे आता बंधनकारक असेल.
TRAI कडून याबाबतचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार कंपन्यांना विशेष रिचार्ज प्लॅन (STV) उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. केवळ व्हॉइस कॉल आणि SMS सुविधा असलेले STV चा पर्याय.
ग्राहकांना ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधता असलेल्या रिचार्जमध्ये फक्त कॉल आणि SMS प्लॅन उपलब्ध करून देणे आवश्यक असेल.
दर महिन्याला एकाच तारखेला रिचार्ज प्लॅनचे नूतनीकरण करता येईल, असा पर्यायही कंपन्यांना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.
एवढेच नाही तर ३० दिवसांपेक्षा जास्त वैधता असलेला किमान एक Voice-SMS प्लॅनचा पर्याय ग्राहकांना द्यावा लागणार आहे.
डेटा सुविधा न घेणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य दरकपातीसह Voice आणि SMS आधारित रिचार्ज प्लॅन देण्याची तरतूद 'ट्राय' कडून करण्यात आली आहे.
मोबाइलवर इंटरनेट डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांना केवळ आवश्यक सेवांसाठी रिचार्ज करण्याचा पर्याय मिळणार आहे. अनावश्यक डेटा सेवेसाठी पैसे खर्च करण्याची गरज कमी नसेल.
आतापर्यंत नाइलाजास्तव ग्राहकांना डेटा पॅकसह कॉल एसएमएसचा पर्याय निवडावा लागत होता. आता ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि बजेटनुसार मोबाइल रिचार्ज निवडणे सोपे होईल.