Deepak Kulkarni
प्रत्येक राज्यातून ‘डोनेट फॉर नेशन’ आणि भारत जोडो न्याय यात्रेसाठी काँग्रेसला मोठा निधी प्राप्त होत आहे.
आतापर्यंत ‘डोनेट फॉर नेशन’ अंतर्गत काँग्रेसला 17 कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती काँग्रेस खजिनदार अजय माकन यांनी दिली.
काँग्रेसने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस कार्यकर्ता, नेते आणि सामान्य लोकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते.
नव्या उपक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस देणगी मागत आहे.
काँग्रेसने देशात जनाधार असलेले नेते शोधण्यासाठी थेट ‘क्लाऊड फंडिंग’मध्ये ‘मोटिव्हेटर’च्या नावाचा ‘कॉलम’ समाविष्ट केला आहे.
यापुढे हा निधी घेताना काँग्रेस या निधीचे प्रेरणा देणारे अर्थात काँग्रेसचे स्थानिक नेते कोण याचा शोध घेणार आहे.
हा निधी जमा करताना 670 रुपये देणाऱ्या डोनरला काँग्रेस राहुल गांधी यांच्या सहीचा एक टी-शर्ट देणार आहे.
यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांचा थेट सहभाग व समर्पण भाव निर्माण होईल.
काँग्रेस या ‘डोनेशन ड्राइव्ह’मध्ये ‘डोनर’ला कोणी ‘मोटिव्हेट’ केले त्याचा कोड टाकण्याचे आवाहन करणार आहे. तशी ‘सिस्टिम’ काँग्रेसने तयार केली आहे.